-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा प्रभूने (Girija Prabhu) नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून, तिच्या या नव्या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा एक सुंदर ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला आहे.
-
या स्टायलिश गाऊनबरोबर गिरीजाने केलेला न्यूड मेकअप आणि मेस्सी हेअरस्टाईल तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहे.
-
दरम्यान, गिरीजा लवकरच ‘दंगल टीव्ही’वरील एका नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
-
‘तीस के पार जब मिला प्यार’ असे या मालिकेचे नाव असून यात गिरीजा मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेचे कथानक अतिशय रंजक आहे. यात गिरीजा एका ३२ वर्षांच्या महिलेची भूमिका साकारत आहे, जी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतकी व्यस्त होते की तिचे लग्नाचे वय निघून जाते.
-
यामुळे तिला समाजाचे आणि लोकांचे टोमणेही सहन करावे लागतात. अशातच तिच्या आयुष्यात एका बिंधास्त आणि मोकळेपणाने जगणाऱ्या मुलाची एन्ट्री होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ