-
स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tujhya Sobatine TV Serial) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री माधवी निमकर (Maadhavi Nemkar) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
-
माधवी नुकतीच तिच्या मुलाबरोबर हिमाचल प्रदेशच्या सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
या ट्रिपचे काही सुंदर फोटो माधवीने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्ये माधवी आपल्या मुलासह आणि काही खास मित्र-मैत्रिणींबरोबर पर्यटनाचा आनंद घेत आहे.
-
पर्यटकांचे नंदनवन असलेल्या या राज्यातील निसर्गरम्य ठिकाणांना ते भेट देत आहेत.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना माधवीने एक खास कॅप्शनही दिले आहे.
-
“डोंगराच्या कुशीत प्रेमळ पाळीव प्राण्याला जवळ घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ