-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) नुकतेच एक नवे फोटोशूट केले असून, तिच्या या राजेशाही लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
या खास फोटोशूटसाठी अश्विनीने पिवळ्या रंगाची देखणी मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीतील या सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी अश्विनीने परिधान केलेल्या सुंदर डिझाईनच्या नथीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सध्या सोशल मीडियावर या नथीचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
-
अश्विनीने या फोटोशूटला “गलत और सही से दूर…. सुंदर, शांत और एकांत” असे एक विचार करायला लावणारे कॅप्शन दिले आहे.
-
अश्विनीच्या या साडीतील मनमोहक रूपावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
आज (३० मे) अश्विनीच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ या ऐतिहासिक चित्रपटाला रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे.
-
अश्विनी नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ