-
नाती जपणं जितकं सुंदर असतं, तितकंच ते आव्हानात्मकही असतं. प्रत्येक नव्या नात्यासोबत येतात नव्या अपेक्षा, नवे विचार आणि नव्या स्वप्नांची चाहूल.
-
नात्यांची हीच अनोखी वीण आणि भावनिक गुंफण घेऊन ‘स्टार प्रवाह’ वाहिनी लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे, जिचे नाव आहे ‘सुना येती घरा’ (Suna Yeti Ghara TV Serial).
-
ही मालिका दोन वेगवेगळ्या कुटुंबांमधील भावनिक संघर्ष आणि बदलत्या नात्यांची एक संवेदनशील कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत दिसणार असून, ती ‘उमावती’ हे पात्र साकारत आहे.
-
छोट्याशा ब्रेकनंतर दीपाने पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीबरोबरची तिची ही पहिलीच मालिका आहे.
-
आपल्या या नव्या भूमिकेविषयी उत्सुकता व्यक्त करताना दीपा म्हणाली, “मालिकेची कथा आणि ‘उमावती’ हे पात्र ऐकताक्षणीच माझ्या मनाला भिडले. उमावती स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहे. आई आणि पत्नी म्हणून आपली कर्तव्ये ती चोख पार पाडते.”
-
“वडील आणि मुलांमधील नात्याला जोडणारा एक संवेदनशील पूल म्हणून ती स्वतःकडे पाहते. अत्यंत श्रीमंत कुटुंबात वाढूनही, तिने पती शिवनाथ यांच्यासोबत शून्यातून स्वतःचा संसार उभा केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला या मालिकेत आणि पात्रांमध्ये स्वतःच्या घराची झलक दिसेल, याची मला खात्री आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपा परब/इन्स्टाग्राम)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ