-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) लवकरच ‘मर्दिनी’ (Mardini Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
अभिनेता श्रेयस तळपदे प्रस्तुत ‘मर्दिनी’ हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीवर आधारित नसून, एका आईच्या भावनिक भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारी ही कथा आहे.
-
प्रार्थना सध्या या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान प्रार्थनाने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रार्थनाने चेक्स टॉप आणि काळ्या रंगाची डेनिम शॉट्स परिधान करून एक हटके लूक कॅरी केला आहे.
-
प्रार्थनाच्या या बोल्ड लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला आहे.
-
नारीशक्ती, संघर्ष, आत्मसन्मान आणि आईच्या सामर्थ्याची हृदयस्पर्शी कथा मांडणारा हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ