-
मृणाल कुलकर्णी सध्या आपल्या कुटुंबासह उटी (Ooty) फिरायला गेल्या आहेत.
-
उटी ट्रिपचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मृणाल कुलकर्णी त्यांचे पती रुचिर कुलकर्णी, मुलगा विराजस आणि सून शिवानी असे चौघंही सध्या उटीमधील निसर्गरम्य वातावरणात एन्जॉय करत आहेत.
-
कुलकर्णी कुटुंबीय उटीमधील एका सुंदर निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये राहिले आहेत.
-
Tea Plantation, सुंदर फुलं, हिरवागार परिसर या सगळ्याची झलक अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
मृणाल कुलकर्णींनी या उटी ट्रिपदरम्यान सुनबाई शिवानीचे सुंदर फोटो काढले आहेत.
-
याशिवाय शिवानी व विराजसचा झोपाळ्यावर बसलेला एक गोड फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
-
या कुटुंबीयांचं एकमेकांशी खूपच सुंदर बॉण्डिंग आहे. यापूर्वी त्यांच्या गोवा ट्रिपचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते.
-
मृणाल कुलकर्णींनी शेअर केलेल्या या सगळ्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मृणाल कुलकर्णी व शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम )
रामदेव बाबांच्या ‘पतंजली’वर तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा बडगा