-
स्टार प्रवाह वाहिनीवर १ जूनपासून ‘पाठराखीण’ (Paathrakhin TV Serial) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि सुखा-दुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची.
-
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) तब्बल ५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहे.
-
या मालिकेत ती ‘प्राजक्ता कुलकर्णी’ ही मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
-
लहान वयातच आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिचे मामा चंद्रशेखर वैद्य यांनी केला आहे.
-
या मालिकेच्या ग्रँड लाँच सोहळ्यासाठी प्राजक्ताने हा मनमोहक लूक केला होता.
-
प्राजक्ताने परिधान केलेल्या या जांभळ्या रंगाच्या सुंदर पैठणी लेहेंग्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ