-
मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेंड निर्माण करण्यासाठी सज्ज असलेला ‘घबाड-कुंड’ (Ghabadkund Movie) हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.
-
त्यांच्या या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ या संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे.
-
चित्रपटात वैष्णवी कल्याणकर, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे आणि प्राजक्ता हनमघर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
-
सध्या या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त वैष्णवी (Vaishnavi Kalyankar) आणि देवदत्तने (Devdatta Nage) केलेले एक हटके फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहे.
-
दोघांच्याही या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून, चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
-
विशेष म्हणजे, ‘घबाड-कुंड’ हा चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
एक टूथब्रश किती महिने वापरणे योग्य? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला