-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
सोनालीने तिची लाडकी लेक सनाया आनंदबरोबर (Sanayaah Anand) मराठमोळ्या लूकमध्ये एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने गडद हिरव्या रंगाची, तर सनायाने देखण्या केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीबरोबरच या मायलेकींनी घातलेले पारंपरिक दागिने त्यांच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
-
हलका मेकअप, पारंपरिक खोपा हेअरस्टाईल आणि केसांत माळलेली चाफ्याची फुलं त्यांच्या या लूकला परिपूर्ण बनवत आहेत.
-
दरम्यान, सोनाली आणि सनाया या रिअल लाईफ मायलेकींनी ‘मायलेक’ या चित्रपटात एकत्र काम करत रुपेरी पडदाही गाजवला आहे.
-
सोनाली आणि सनायाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा!
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
रामदेव बाबांच्या ‘पतंजली’वर तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा बडगा