-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या (Shivani Surve) नव्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने गडद लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी परिधान केली आहे.
-
नऊवारी साडीतील या पारंपरिक लूकवर शिवानीने भरजरी दागिन्यांचा सुंदर साज केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना शिवानीने बॅकग्राउंडला ‘कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतरयामी’ हे गाणं जोडलं आहे.
-
शिवानीने या फोटोशूटला ‘Serving Looks, The Marathi Way’ असं हटके कॅप्शनही दिलं आहे.
-
शिवानीच्या या फोटोंवर तिचा पती आणि अभिनेता अजिंक्य ननावरेने ‘मालकीण बाई आलोच…’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.
-
शिवानीने आजवर अनेक मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”