-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
या मालिकेतील ‘सावली’ या मुख्य भूमिकेने प्रेक्षकांच्या घराघरांत तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
प्राप्तीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
तिने परिधान केलेला वाईन रंगाचा खणाचा सुंदर अनारकली ड्रेस तिच्या सौंदर्याला चारचाँद लावत आहे.
-
या ड्रेसला असलेली पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर जरीची काठ डिझाईन अधिकच आकर्षक दिसत आहे.
-
हा सुंदर ड्रेस प्राप्तीच्या आईने म्हणजेच ज्योती रेडकर यांनी स्वतः तिच्यासाठी शिवला आहे.
-
या लूकवर प्राप्तीने गळ्यात नाजूक काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आणि मॅचिंग चोकर हार परिधान केला आहे.
-
फोटोंना कॅप्शन देताना प्राप्तीने तिच्या मालिकेच्या नावाचा संदर्भ देत ‘सावली’ असे लिहिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”