-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपा परब चौधरीने (Deepa Parab Chaudhari) नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दीपाने पेस्टल गुलाबी रंगाचा अत्यंत सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला असून, तिचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
दीपा लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुना येती घरा’ (Suna Yeti Ghara TV Serial) या नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
दोन कुटुंबांमधील भावनिक संघर्ष आणि नव्या नात्यांमुळे येणारे बदल, यांची एक सुंदर कथा ही मालिका उलगडणार आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या अशा कौटुंबिक कथा सादर करण्यासाठी ओळखली जाते.
-
या मालिकेत दीपा सोबतीला अशोक शिंदे, मेघना वैद्य, शर्मिष्ठा राऊत, सत्यजीत साळोखे, शुभम पडे, सिद्धव साळोखे आणि मनोज कोल्हटकर असे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
नात्यांच्या अनोख्या गुंफणीची ही नवी गोष्ट १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपा परब चौधरी/इन्स्टाग्राम)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”