-
मराठमोळी लोकप्रिय गायिका सावनी रवींद्र (Savaniee Ravindrra) सध्या तिच्या सुट्टी मूडमध्ये असून, तिच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
मुख्यत्वे मराठी संगीतसृष्टीत आपल्या सुरांनी रसिकांना भुरळ घालणारी सावनी एक उत्कृष्ट आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.
-
कामातून वेळ काढत सावनी सध्या समुद्रकिनारी आपल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
-
या सुट्टी लूकसाठी सावनीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंटेड स्कर्ट परिधान केला आहे, जो तिला खूपच शोभून दिसतोय.
-
सावनीच्या या फ्रेश लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
२०२१ मध्ये ‘बार्डो’ चित्रपटातील गाण्यासाठी सावनीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने (National Film Award) सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे तिचे नाव देशभरात पोहोचले.
-
सावनीने केवळ मराठीतच नव्हे, तर तमिळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती अशा विविध प्रादेशिक भाषांमध्येही आपली गायकी सिद्ध केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सावनी रवींद्र/इन्स्टाग्राम)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण