-
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा पवार आता छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
आपल्या हटके रील्सच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते आणि तिचे रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.
-
आता श्रद्धा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मराठी मीडियम’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
नुकतेच या मालिकेच्या भव्य प्रमोशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
या प्रमोशनदरम्यान श्रद्धाने नेसलेल्या पारंपरिक साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने पिवळी काठ असलेली गडद निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती.
-
या लूकवर तिने गळ्यात सोन्याची कोरीव माळ तसेच नाकात पारंपरिक नथ घालून मराठमोळा साज केला होता.
-
या पारंपरिक लूकवर श्रद्धा अत्यंत देखणी आणि सुंदर दिसत होती.
-
तिच्या या नव्या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रद्धा पवार/इन्स्टाग्राम)
अभिनेत्री संचिता उगलेचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी कनेक्शन? संचिताच्या भावाचा खळबळजनक आरोप