-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्या भूतानच्या (Bhutan) सफरीवर आहे.
-
सायलीने सोशल मीडियावर तिच्या या खास भूतान सफरीचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
भूतान हा दक्षिण आशियातील एक अतिशय सुंदर, शांत आणि पर्वतांनी वेढलेला देश आहे.
-
हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश आपल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीसाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
-
येथील लोकसंख्येचा मोठा भाग बौद्ध धर्मीय आहे, तर काही प्रमाणात हिंदू धर्मीय लोकही इथे गुण्यागोविंदाने राहतात.
-
शांतता, निसर्ग आणि अध्यात्माची आवड असणाऱ्यांसाठी भूतान हे एक खरेखुरे नंदनवनच आहे!
-
भूतानला जगभरात “आनंदी लोकांचा देश” (The Land of Happiness) म्हणून ओळखले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”