-
अभिनेत्री भाग्यश्रीने मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
रितेश देशमुख दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात भाग्यश्री राजमाता जिजाऊंची भूमिका साकारत आहे.
-
या चित्रपटाच्या सेटवरील आणि स्वतःच्या लूकचे काही फोटो तिने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
-
पोस्ट शेअर करत, “भारतीय इतिहासातील सर्वात कर्तृत्ववान आणि आदर्श स्त्रीची म्हणजेच ‘जिजाबाई’ यांची भूमिका साकारून आता एक महिना झाला आहे. ‘मैने प्यार किया’मधील एका साध्या, सुजाण नायिकेची भूमिका साकारण्यापासून ते जिजाऊंसारख्या खंबीर, कणखर स्त्रीचे रूप रुपेरी पडद्यावर साकारण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आयुष्यातील विविध अनुभवांमुळे हा बदल करणे सहज शक्य झाले. पण, हा टप्पा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरण्यामागे दोन महत्त्वाचे घटक आहेत: १. रितेश देशमुख यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या पडद्यावरील स्वप्नात मला रंग भरण्याची दिलेली सुवर्णसंधी. २. तुम्हा सर्वांकडून मिळालेले अथांग आणि अफाट प्रेम. तुमच्या या प्रेमासाठी मनाच्या तळापासून खूप खूप धन्यवाद!” असे भाग्यश्रीने म्हटले आहे.
-
भाग्यश्रीच्या या पोस्टमुळे ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.
-
चित्रपटात राजमाता जिजाऊंचा हा भव्य आणि ऐतिहासिक काळ खूप सुरेख पद्धतीने साकारण्यात आला आहे.
-
भाग्यश्रीचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाखाली आकाराला आलेल्या या भव्य ऐतिहासिक पटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री/इन्स्टाग्राम)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”