-
या फोटोतील सुंदर मराठी अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
-
ही आहे मराठी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री मानसी नाईक.
-
Manasi Naik Paithani Saree Photos: मानसी नाईक हिने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लाल रंगाच्या पैठणी साडीतील तिच्या या नखरेल आणि पारंपरिक रूपाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
-
आपल्या नृत्याने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मानसीने नुकतेच एक नवे फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये मानसी लाल रंगाच्या सुंदर पैठणी साडीमध्ये अत्यंत देखणी दिसत आहे.
-
गळ्यात पारंपरिक दागिने, हातात हिरवा चुडा तिच्या या मराठमोळ्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
मानसीच्या या ग्लॅमरस आणि तितक्याच सात्विक लूकने सोशल मीडियावरील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिचे हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो- मानसी नाईक इन्स्टाग्राम)
३ वर्षातून एकदा येते ‘ही’ संकष्टी चतुर्थी, अधिक महिन्यामुळे ठरते खास; पाहा तारीख, चंद्रोदय आणि उपवसाची योग्य वेळ