-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सायली सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.
-
सायली संजीव सध्या निसर्गरम्य भूतानमध्ये पर्यटनाचा निवांत आनंद घेताना दिसत आहे.
-
नुकतेच तिने भूतानमधील प्रसिद्ध ‘लाँगेस्ट सस्पेन्शन ब्रिज’ (Longest Suspension Bridge) वरून काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीचा अतिशय कुल, कॅज्युअल आणि स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.
-
तिने हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा चेक प्रिंटेड वनपीस परिधान केला असून त्यावर डेनिम जॅकेट मॅच केले आहे.
-
नदीवर असणाऱ्या या विशाल पुलावर सायली निसर्गाचा आणि थंड हवेचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
-
भूतानच्या हिरव्यागार पर्वतांच्या पार्श्वभूमीवर आलेले सायलीचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सायली संजीव/इन्स्टाग्राम)
३ वर्षातून एकदा येते ‘ही’ संकष्टी चतुर्थी, अधिक महिन्यामुळे ठरते खास; पाहा तारीख, चंद्रोदय आणि उपवसाची योग्य वेळ