-
अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच एका हिरव्यागार बागेत सुंदर काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आणि स्टायलिश ओव्हरकोटमध्ये फिरताना दिसली.
-
या निसर्गरम्य वातावरणातील तिचा शांत आणि आनंदी अंदाज एखाद्या ट्रॅव्हल डायरीच्या पानासारखा वाटत होता.
-
“मे महिना खूप छान होता, मी कोणत्याही शहरात गेले तरी सर्वोत्तम हॉट चॉकलेटचा शोध सुरूच असतो आणि शेवटी मला आतापर्यंतचे सर्वात भारी हॉट चॉकलेट आणि कॉफी मिळाली” अशी पोस्ट कतरिनाने सोशल मीडियावर लिहित आपले फोटो शेअर केले.
-
या पोस्टमध्ये तिने एक कौटुंबिक फोटो शेअर करत, “आनंदी कुटुंब, पण मम्मीची केशरचना मात्र थोडी विचित्र आहे,” अशी मजेशीर ओळही लिहिली.
-
अभिनेता विकी कौशल या पिकनिकदरम्यान कतरिनासोबत डोक्यावर हात ठेवून निवांत बसलेला पाहायला मिळाला.
-
गेल्याच महिन्यात या जोडप्याने विकी कौशलचा ३८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
-
कतरिनाने तिचा मुलगा विहानसोबत पुस्तक वाचतानाचा एक शांत आणि सुंदर क्षणही चाहत्यांसोबत शेअर केला.
-
मे महिन्यातील या साध्या पण अत्यंत सुंदर आठवणींनी कतरिनाने तिच्या चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: कतरिना कैफ/इन्स्टाग्राम)
३ वर्षातून एकदा येते ‘ही’ संकष्टी चतुर्थी, अधिक महिन्यामुळे ठरते खास; पाहा तारीख, चंद्रोदय आणि उपवसाची योग्य वेळ