-
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांचा बहुप्रतिक्षित ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhhagya Viddhaata) हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
हा चित्रपट २००८ मध्ये मुंबईत झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
मुंबईतील कामा हॉस्पिटलमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारलेला असून कंगना यात एका नर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
विशेष म्हणजे, या चित्रपटात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
-
नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.
-
या सोहळ्यासाठी कंगना यांनी पांढऱ्याशुभ्र मोती रंगाची आणि जांभळा काठ असलेली अत्यंत सुंदर सिल्क साडी नेसली होती.
-
‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज तापडिया यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कंगना रणौत/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात कारवाई… शेकडो किलो प्रतिबंधात्मक तंबाखू जप्त…