-
मराठी गायक संजू राठोडच्या (Sanju Rathod) ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) या सुपरहीट गाण्यातून अभिनेत्री आणि नृत्यांगना प्राजक्ता घाग (Prajakta Ghag) घराघरात पोहोचली.
-
२०२४ मध्ये या गाण्याने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लाखो लोकांनी या गाण्यावर रील बनवले होते.
-
‘गुलाबी साडी’ व्यतिरिक्त प्राजक्ताने संजू राठोडच्या ‘नऊवारी पाहिजे’ आणि ‘कसं डिंपल येतंय गालावरी’ या लोकप्रिय गाण्यांमध्येही काम केले आहे.
-
प्राजक्ताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिच्या पतीचे नाव रोहित बोराडे आहे.
-
अनेक वर्षं रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला.
-
रोहित व्यवसायाने एक फिटनेस ट्रेनर आहे.
-
१६ मार्च २०२५ रोजी प्राजक्ता आणि रोहितच्या घरी एका गोंडस चिमुकलीचे आगमन झाले.
-
प्राजक्ता आणि रोहितने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘मुक्ता’ असे ठेवले आहे.
-
मार्च महिन्यात मुक्ताचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
या खास निमित्ताने प्राजक्ताने कुटुंबासह एक सुंदर फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता घाग/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात कारवाई… शेकडो किलो प्रतिबंधात्मक तंबाखू जप्त…