-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) सध्या कुटुंबासोबत उटी (Ooty) सफरीचा आनंद घेत आहे.
-
दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात, नीलगिरी पर्वतांच्या कुशीत वसलेले ‘उटी’ हे एक अत्यंत प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
-
उटीच्या या निसर्गरम्य वातावरणात शिवानीने एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो शेअर करत शिवानीने त्याला ‘Heart Is Full!’ (मन तृप्त झाले!) असे गोड कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने पती विराजस कुलकर्णी, सासूबाई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच सासरे रुचिर कुलकर्णी यांच्यासह खास पोज दिली आहे.
-
उटी हे ठिकाण चहाच्या उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध असून, येथील डोंगररांगांवर पसरलेले हिरवेगार चहाचे मळे पर्यटकांचे मन वेधून घेतात.
-
निसर्गाबरोबरच उटीमध्ये बनवली जाणारी ‘होममेड चॉकलेट्स’ देखील पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…