-
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) ‘माँ बहन’ (Maa Behen) हा चित्रपट आज (४ जून) ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
-
हा चित्रपट हिंदी भाषेतील असला, तरी मराठी प्रेक्षकांमध्येही याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
‘माँ बहन’ हा एक डार्क क्राईम-कॉमेडी (Dark Comedy Thriller) चित्रपट आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले असून, ही एका आईची आणि तिच्या दोन मुलींची कथा आहे.
-
या चित्रपटात माधुरीने ‘रेखा’ नावाच्या आईची मुख्य भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपट रिलीज होताच माधुरीने सोशल मीडियावर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये माधुरीने फ्लोरल बॉर्डर असलेली आकर्षक राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
अभिनेत्री संचिता उगलेचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी कनेक्शन? संचिताच्या भावाचा खळबळजनक आरोप