-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan) चित्रपटातील छोटी ‘मुन्नी’ म्हणजेच अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) आता मोठी झाली आहे.
-
३ जून २००८ रोजी जन्मलेली हर्षाली आता अधिकृतपणे १८ वर्षांची झाली असून, नुकताच तिने आपला १८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
हर्षालीने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर करत, त्याला ‘Chapter 18: Unlocked’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या खास दिवसासाठी हर्षालीने गुलाबी रंगाचा एक सुंदर वन-पीस ड्रेस परिधान केला होता.
-
अगदी कमी मेकअप आणि मोकळे केस ठेवून हर्षालीने आपला लूक सिंपल ठेवला होता.
-
हर्षालीच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त गुलाबी रंगाची फ्लॉवर थीम असलेला एक कस्टमाइज्ड केक आणण्यात आला होता.
-
२०१५ मध्ये आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून हर्षालीने वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
या चित्रपटात तिने ‘शहिदा’ ऊर्फ ‘मुन्नी’ या बोलू न शकणाऱ्या पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : हर्षाली मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
‘एक ग्लास पाणी दे’ म्हणणाऱ्यांनो, ‘ग्लास’ला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? उत्तर पाहा…