-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाणच्या (Yogita Chavan) नव्या फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
या फोटोशूटसाठी योगिताने एका सुंदर सोनेरी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
या सोनेरी साडीवर योगिताने मॅचिंग ऑफ-शोल्डर ब्लाऊज परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
हे खास फोटो शेअर करताना योगिताने एक रोमँटिक कविता कॅप्शनमध्ये लिहिली आहे “आज फिर सावन ने.. खिड़की पर दस्तक दी है, कुछ बूंदें आई हैं.. पुरानी यादों का पता पूछती हुई। मैंने चुपचाप.. हथेली आगे कर दी, बारिश देर तक तुम्हारा नाम लिखती रही।”
-
योगिता सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ (Tu Anolakhi Tari Sobati) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या मालिकेत योगिता ‘अर्पिता’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
याआधी कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील ‘अंतरा’च्या भूमिकेमुळे योगिता घराघरांत पोहोचली असून तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)
‘एक ग्लास पाणी दे’ म्हणणाऱ्यांनो, ‘ग्लास’ला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? उत्तर पाहा…