-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) या मालिकेत ‘भावना’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
अक्षयाने नुकतेच तिच्या ‘भरजरी’ या स्वतःच्या साडी ब्रँडसाठी एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अक्षयाने पोपटी रंगाची, सुंदर थ्रेड वर्क असलेली कॉटन साडी साडी नेसली आहे.
-
या पोपटी साडीवर लूक आणखी खुलवण्यासाठी अक्षयाने आकर्षक ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
-
अक्षयाने या साडीतील फोटोंना ‘मेहके ख्वाब… और मौसम का जादू…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
आज घराघरांत पोहोचलेल्या अक्षयाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात प्रायोगिक नाटकांतून केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
आजपासून सूर्याचे मिथुन राशीत पदार्पण; ‘या’ ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस, तर ‘या’ राशींना आरोग्याची घ्या काळजी