-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर ही ‘कृष्णा’ ही मुख्य भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारत आहे.
-
मालिकेच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत समृद्धीने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
समृद्धीने शेअर केलेले हे फोटो तिच्या मनाली ट्रिपदरम्यानचे असून तिने या आठवणींना ‘Snowy throwback’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
समृद्धी निळ्या विंटर सूटमध्ये हवेत बर्फ उडवून आनंद साजरा करताना दिसत आहे.
-
तिने सुंदर मफलर परिधान केला असून ती मनालीच्या निसर्गाचा आनंद घेत आहे.
-
ती बर्फाच्छादित टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही हात उंचावून आनंदाने पोझ देत आहे.
-
मनालीच्या या थंडगार आणि सुंदर वातावरणातील समृद्धीचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”