-
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कमालीच्या लोकप्रिय शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) घराघरात पोहोचली.
-
या शोमधील एकमेव मुख्य महिला कलाकार म्हणून श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
श्रेया केवळ उत्तम विनोदच करत नाही, तर कोणत्याही भूमिकेत सहज आणि अचूक समरस होते.
-
सध्या श्रेया अलिबागमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तिने तिथले काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना श्रेयाने, “उन्हाळ्याचे शेवटचे दिवस… चला, आपल्या बालपणाला आणखी एक फेरी मारून येऊया!!” असे भावनिक कॅप्शन दिले आहे.
-
अलिबाग (Alibaug) हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि प्रसिद्ध किनारपट्टीचे शहर आहे.
-
मुंबई आणि पुणेकरांसाठी तर अलिबाग हे नेहमीच हक्काचे ‘वीकेंड डेस्टिनेशन’ मानले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…