-
स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका ‘पाठराखीण’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले मुख्य भूमिका साकारत असून, त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
-
नुकतेच प्राजक्ता गायकवाडने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून गौरीसोबतचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
हे फोटो समुद्राच्या विलोभनीय अशा पार्श्वभूमीवर काढण्यात आले असून, त्यात दोघींचाही एक अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.
-
फोटो शेअर करताना प्राजक्ताने या पोस्टला आपल्या मालिकेचे नाव म्हणजेच ‘#पाठराखीण’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ता गायकवाडने निळ्या रंगाचा सुंदर डिझायनर कुर्ता परिधान केल्याचे दिसून येत आहे.
-
तर दुसरीकडे गौरी इंगवले लाल रंगाचा टॉप आणि त्यावर फ्लोरल प्रिंटेड स्कर्ट अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.
-
समुद्राकाठच्या खडकांवर बसून एकमेकींच्या गळ्यात हात टाकून दिलेल्या या पोज त्यांच्यातील घट्ट बाँडिंग दर्शवतात.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांच्या कामाची व्यंगचित्रकाराने घेतली दखल