-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेचे (Amruta Dhongade) ‘आली लखाबाई’ (Aali Lakhabai Song) हे नवे गाणे यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.
-
देवी लखाबाईच्या आख्यायिकेवर आधारित असलेल्या या गाण्यातून लोकपरंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे.
-
सुमारे आठ मिनिटांच्या या भव्य गाण्यातून देवीचा महिमा अतिशय सुंदररित्या मांडण्यात आला आहे.
-
अमृताने नुकतेच इन्स्टाग्रामवर या गाण्यातील तिचे काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृता पारंपरिक केशरी रंगाच्या कॉटन साडीमध्ये दिसत आहे.
-
‘आली लखाबाई’ गाण्याची निर्मिती आणि संगीत दिग्दर्शन हितेश मोडक यांनी केले असून, राजू मांडलिक यांनी हे गाणे लिहिले आहे.
-
सौरभ साळुंखे आणि ईश्वरी बाविस्कर यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
ज्याच्या हास्यावर जग फिदा झाले; तो अरुणकुमार कुठला? खरी कहाणी जाणून डोळे पाणावतील