-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता समीर खांडेकरने (Sameer Khandekar) व्यवसायाच्या क्षेत्रात एक नवीन पाऊल टाकले आहे.
-
मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात ६ जून रोजी समीरने आपल्या नवीन हॉटेलची सुरुवात केली.
-
‘पिठी भात’ (Pithi Bhaat Hotel Dadar) असे या हॉटेलचे नाव असून, याच्या वेगळ्या इंटेरियरने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
समीरच्या या ‘पिठी भात’ हॉटेलमध्ये खवय्यांना अस्सल मालवणी शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
-
व्यवसायाबरोबरच समीरने हॉटेलच्या अंतर्गत सजावटीवर विशेष मेहनत घेतली आहे.
-
संपूर्ण हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे.
-
विशेष म्हणजे, हॉटेलच्या भिंतींवर कोकणाचा सुंदर प्रवासी मार्ग रेखाटण्यात आला असून आकर्षक फोटो फ्रेम्सही लावण्यात आल्या आहेत.
-
तसेच, प्लास्टिकला फाटा देत हॉटेलमध्ये काचेच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे.
-
समीरच्या या नवीन सुविधेबद्दल आणि व्यवसायाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : समीर खांडेकर/इन्स्टाग्राम)
‘थोडी तरी लाज बाळगा’, माजी क्रिकेटपटू, खासदार युसूफ पठाणवर महुआ मोईत्रा संतापल्या; अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाल्या…