-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या आपल्या कुटुंबासह मुंबई (Mumbai) सफरीचा आनंद घेत आहे.
-
नुकतीच प्राजक्ताने मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय’ म्हणजेच ‘राणीच्या बागेला’ (Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo) भेट दिली.
-
या सफरीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्राजक्ताने एक मजेशीर कॅप्शन दिले आहे.
-
प्राजक्ताने लिहिले, “उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं मामाच्या गावी जातात, ही आत्तूच्या शहरी येतात…”
-
निसर्गाच्या कुशीत वसलेली ही राणीची बाग मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण आहे.
-
येथे असलेले विविध प्राणी आणि परदेशी पक्षी पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक गर्दी करतात.
-
विशेष म्हणजे, २०१६ मध्ये दक्षिण कोरियातून येथे ७ पेंग्विन आणण्यात आले होते; सध्या या पेंग्विनची संख्या वाढून २१ वर पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
‘थोडी तरी लाज बाळगा’, माजी क्रिकेटपटू, खासदार युसूफ पठाणवर महुआ मोईत्रा संतापल्या; अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाल्या…