-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनीने (Gashmeer Mahajani) सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
नुकताच गश्मीरचा मुलगा व्योमचा मुंज सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला.
-
गश्मीरने या खास सोहळ्याचे क्षणचित्र चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गश्मीर आणि व्योम पारंपरिक वेशभूषेत अत्यंत देखणे दिसत आहेत.
-
या कौटुंबिक सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून व्योमला आशीर्वाद दिले.
-
विशेष म्हणजे, काल ८ जून रोजी गश्मीरचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याच्यावर चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
-
गश्मीरने आजवर अनेक दर्जेदार चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गश्मीर महाजनी/इन्स्टाग्राम)
‘थोडी तरी लाज बाळगा’, माजी क्रिकेटपटू, खासदार युसूफ पठाणवर महुआ मोईत्रा संतापल्या; अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाल्या…