-
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री गिरीजा ओकने (Girija Oak Godbole) चित्रपट, नाटक, मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
गिरीजा लवकरच ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhhagya Viddhaata Movie) या आगामी बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.
-
हा चित्रपट २६/११ च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यातील सत्य घटनांवर आधारित आहे.
-
या चित्रपटात गिरीजासह कंगना रणौत, स्मिता तांबे, प्रिया बेर्डे आणि ईशा डे अशा दिग्गज कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच गिरीजाने नुकतेच साडीमध्ये एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने अत्यंत सुंदर अशी स्ट्राइप्स मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
-
या मुनिया पैठणी साडीला साजेसा असा हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल करत गिरीजाने तिचा लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा ओक गोडबोले/इन्स्टाग्राम)
‘थोडी तरी लाज बाळगा’, माजी क्रिकेटपटू, खासदार युसूफ पठाणवर महुआ मोईत्रा संतापल्या; अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाल्या…