-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री, मॉडेल आणि स्टंट रायडर स्मिता गोंदकर (Smita Gondkar) सध्या तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
स्मिताने नुकतेच पुण्यातील ऐतिहासिक ‘बेलटुंगवाड्या’त एक खास पारंपारिक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्मिताने पिवळ्या रंगाची सुंदर भरजरी साडी आणि त्यावर लाल रंगाचा आकर्षक आरी वर्क असलेला ब्लाऊज परिधान केला होता.
-
या पारंपारिक लूकला अधिक देखणं बनवण्यासाठी स्मिताने त्यावर साजेशी अशी सुंदर ज्वेलरी परिधान केली होती.
-
“पारंपरिक… पण सदैव ट्रेंडमध्ये” असं कॅप्शन देत स्मिताने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
स्मिताचा हा मराठमोळा आणि सात्विक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या स्मिताला खऱ्या अर्थाने घराघरांत लोकप्रियता मिळाली ती तिच्या “पप्पी दे पारुला” या सुपरहिट गाण्यामुळे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्मिता गोंदकर/इन्स्टाग्राम)
‘थोडी तरी लाज बाळगा’, माजी क्रिकेटपटू, खासदार युसूफ पठाणवर महुआ मोईत्रा संतापल्या; अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाल्या…