-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (Manjiri Oak) सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
-
निमित्त आहे त्यांनी अधिकमासानिमित्त (Adhik Maas 2026) आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमाचे.
-
प्रसाद आणि मंजिरी यांनी अधिकमासाचे औचित्य साधत चित्रपटसृष्टीतील तब्बल ३३ जोडप्यांना आमंत्रित करून एका शाही पंगतीचे आयोजन केले होते.
-
या ३३ जोडप्यांसाठी पारंपरिक पद्धतीने आदर-सन्मान करत अत्यंत चविष्ट मेजवानीचा बेत आखण्यात आला होता.
-
आमंत्रित कलाकारांनी सोशल मीडियावर या ‘अविस्मरणीय संध्याकाळी’चे फोटो शेअर करत ओक दांपत्याचे आभार मानले आहेत.
-
हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास (पुरुषोत्तम मास) यंदा १७ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत आहे.
-
ग्रामीण भागात याला ‘धोंड्याचा महिना’ असेही म्हटले जाते. या महिन्यात जावयाला तसेच ब्राह्मणाला वाण देण्याची परंपरा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंजिरी ओक/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…