-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना उर्मिला कोठारे तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
सध्या सोशल मीडियावर उर्मिलाच्या एका नव्या आणि अतिशय सुंदर फोटोशूटची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये उर्मिलाने नेसलेली गडद लाल रंगाची रफल साडी तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावत आहे.
-
या लाल साडीवर तिने परिधान केलेले काळ्या रंगाचे स्लीव्हलेस ब्लाउज तिच्या लुकला ग्लॅमरस बनवते.
-
आपला लुक पूर्ण करण्यासाठी तिने हातामध्ये चांदीच्या सुंदर बांगड्या आणि कानात मॅचिंग झुमके घातले आहेत.
-
हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाकडी रेलिंगजवळ उभे राहून तिने दिलेली पोझ चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने, ‘If you swipe long enough, you’ll find so many version of me’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
निसर्गरम्य वातावरणातील उर्मिलाचा हा साधा पण तितकाच मोहक साडी लुक चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: उर्मिला कोठारे/इन्स्टाग्राम)
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”