-
‘दीप-ज्योती’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री पूर्वा कौशिक सध्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री सलोनी सुर्वे ही पूर्वासोबत तिच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.
-
मालिकेत पूर्वा ही ‘ज्योती’ची मुख्य भूमिका साकारत असून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
तर दुसरीकडे सलोनी या मालिकेत ‘कीर्ती’ची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारत आहे.
-
नुकतेच या दोन्ही ऑन-स्क्रीन बहिणींचे काही क्युट आणि सुंदर फोटो समोर आले आहेत.
-
या फोटोंमध्ये दोघींमधील पडद्यामागची घट्ट मैत्री आणि अप्रतिम बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येत आहे एकमेकींना मिठी मारत त्यांनी कॅमेऱ्यासमोर अतिशय गोड आणि मजेशीर पोझ दिल्या आहेत.
-
पूर्वा आणि सलोनीने या खास फोटोशूटसाठी सुंदर साडी परिधान केली आहे.
-
दोघींनीही पारंपरिक दागिने आणि केसांची सुंदर हेअरस्टाईल करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सलोनी सुर्वे/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…