-
लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताच तिचा वाढदिवस नैनितालच्या निसर्गरम्य वातावरणात साजरा केला. याचे खास फोटो तेजश्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
तेजश्री आपल्या वाढदिवसानिमित्त कैंची धाम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. उत्तराखंडमधील नैनिताल येथे स्थित कैंची धाम हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. याठिकाणी नीम करोली बाबांच्या आश्रमात मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात.
-
देश-विदेशातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी, उद्योगपती आणि खेळाडू येथे दर्शनासाठी येतात. विराट कोहली व अनुष्का शर्मा, मार्क झुकरबर्ग यांनीही यापूर्वी कैंची धामला भेट दिली आहे.
-
तेजश्रीने कैंची धाम मंदिरात दर्शन घेतल्यावर नैनितालच्या निसर्गरम्य वातावरणात ट्रेकिंगचा आनंद घेतला. अभिनेत्रीने पहाडी मॅगीचा फोटोही शेअर केला आहे.
-
नैनिताल हे उत्तराखंडमधील अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे. दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक नैनिताल फिरायला जातात. तेजश्रीने याच निसर्गरम्य वातावरणात तिचा बर्थडे केक सुद्धा कापला.
-
तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त सुंदर, रंगबेरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. यावेळी बर्थडे सेलिब्रेशन करताना तेजश्रीने ग्लॅमरस लूक केला होता.
-
तेजश्री या फोटोंना कॅप्शन देत म्हणते, “दररोज सकाळी उठल्यावर आपण म्हणतो…वॉव! आपलं आयुष्य सुंदर आहे आणि हीच गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवते! याच सुंदर भावनेची ३८ वर्ष”
-
यावरून तेजश्री प्रधानने तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
तेजश्री प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम )
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”