-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi Season 5 Winner) सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
सूरज लवकरच बाबा होणार असून, त्याची पत्नी संजना चव्हाणच्या (Sanjana Chavan) डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
-
बाळाच्या स्वागतासाठी आणि होणाऱ्या आईचे कोडकौतुक करण्यासाठी या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
या पारंपरिक कार्यक्रमात संजनाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
डोहाळे जेवणासाठी संजनाने एक सुंदर हिरव्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती.
-
तसेच, हातावर काढलेली मेहंदी आणि फुलांच्या दागिन्यांमुळे तिच्या सौंदर्याला अधिकच बहर आला होता.
-
यापूर्वी मार्च महिन्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजनाची ‘चोरओटी’ भरली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
-
सूरज आणि संजनाचा विवाहसोहळा नोव्हेंबर २०२५ मध्ये बारामती येथे अत्यंत थाटामाटात पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सूरज चव्हाण/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…