-
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री ऋता दुर्गुळेने (Hruta Durgule) आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ भावाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
सध्या ऋता ‘ठरलंय FOREVERR’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
हे एक अतिशय अनोखे, आधुनिक आणि व्यावसायिक नाटक आहे.
-
या नाटकाचे विशेष आकर्षण म्हणजे ऋता यात केवळ मुख्य भूमिकेतच नाही, तर तिने सह-निर्माती म्हणूनही एक नवी आणि महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.
-
दरम्यान, ऋताने नुकतेच सोशल मीडियावर एक मनमोहक फोटोशूट शेअर केले आहे.
-
यात ऋताने फिकट हिरव्या रंगाची सुरेख सिल्क साडी नेसली असून तिच्या या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
हे फोटो शेअर करताना ऋताने ‘Life Is Better With Flowers’ (फुलांबरोबर आयुष्य अधिक सुंदर असते) असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…