-
मनोज तपाडिया दिग्दर्शित ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhhagya Viddhaata) हा बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपट नुकताच १२ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री ईशा डेने (Esha Dey) बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले आहे.
-
या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त ईशाने सोशल मीडियावर सेटवरील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
हा चित्रपट मुंबईतील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यादरम्यान घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.
-
दहशतवाद्यांनी जेव्हा मुंबईला कचाट्यात घेतले, तेव्हा ‘कामा हॉस्पिटल’मधील धाडसी नर्स, डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जवळपास ४०० रुग्णांचे प्राण वाचवले होते.
-
हा चित्रपट संकटकाळात ‘अदृश्य हिरो’ ठरलेल्या याच सामान्य कर्मचाऱ्यांच्या शौर्याची आणि त्या काळरात्रीच्या थराराची गाथा मांडतो.
-
या चित्रपटात ईशाने एका तरुण नर्सची भूमिका साकारली आहे. हॉस्पिटलवर आलेल्या या अचानक संकटसमयी ती अत्यंत धैर्याने आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना करताना दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशा डे/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…