-
जाई खांडेकर मराठी मालिकाविश्वातील अशा नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे जिने अवघ्या कमी कालावधीतच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.
-
जाई सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘आनंदी’ या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकत आहे. यामध्ये ती आनंदी या अंध मुलीची भूमिका साकारत असून तिच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
-
जाई खऱ्या आयुष्यात सोशल मीडियावर सक्रिय असते आणि यामार्फत तिच्या दैनंदितन जीवनातील घडामोडी ती शेअर करत असते.
-
अभिनेत्री अनेकदा सेटवरचे फोटोही पोस्ट करत असते.
-
जाईन अशातच आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून मालिकेत सोज्वळ आणि सुंदर दिसणाऱ्या आनंदीचा यामधून बिंदास्त अंदाज पाहायला मिळत आहे.
-
जाईने नुकतेच तिचे निळ्या रंगाच्या फलांची सुंदर डिझाइन असलेल्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. याला तिने खास कॅप्शनही दिली आहे.
-
जाईच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिने हॉल्टर-नेक ट्यूब ड्रेस घातला असून केस मोकळे सोडले आहेत.
-
छोटे कानातले परिधान करत सिंपल मेकअप ठेवल्याने ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय.
-
वेगवेगळ्या पोज देत तिने तिचे हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…