-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असून, संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरे यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर करीत सोशल मीडियावर एक मोठी आणि भावनिक पोस्ट लिहिली आहे.
-
तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “तुमच्यासाठी ‘राज ठाकरे’ हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी ती भावना आहे. हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे, असं वाटतं. मी अपवाद नाही. साहेब, तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरू दे, तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे, कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळू दे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतःमधील संवेदनशीलता जपता येऊ दे, अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, हसत राहा. खूप प्रेम. जय महाराष्ट्र.”
-
तिची ही भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, मनसे सैनिक आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
तेजस्विनीने राज ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो शेअर करून, त्यांच्याप्रति असलेला आपला आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे.
-
राज ठाकरेंच्या या विशेष दिवशी तिने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.
-
या विशेष दिनी तेजस्विनी पंडितने लिहिलेली ही मनापासूनची पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: तेजस्विनी पंडित/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…