-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) आणि अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date) यांची मुख्य भूमिका असलेली ‘डेटिंग सेटिंग’ (Dating Setting) ही नवी वेब सीरिज ‘मराठी स्टेज’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
-
तरुण पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी, हसता-हसता डोळ्यात पाणी आणणारी आणि विचार करायला लावणारी ही एक आगळीवेगळी कथा आहे.
-
या सीरिजमध्ये श्रेयाने ‘इशा’, तर क्षितीशने ‘आदि’ ही भूमिका साकारली आहे.
-
दोघांमधील प्रेमाची नवी केमिस्ट्री आणि संवादाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.
-
नुकतेच श्रेयाने या सीरिजच्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यांना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
-
१२ जूनपासून या सीरिजचे स्ट्रीमिंग सुरू झाले असून, दर शुक्रवारी ‘मराठी स्टेज’वर याचे दोन नवे एपिसोड्स रिलीज केले जाणार आहेत.
-
या नव्या सीरिजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
“शेअर्स विका ३०-४० टक्के घसरण होणार आहे”, ‘या’ क्षेत्रातील कंपन्यांबाबत ब्रोकरेज फर्मचा इशारा