-
लोकप्रिय मराठी मालिका ‘ठरलं तर मग’मधील अभिनेत्री मोनिका दबाडे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
-
मालिकेतील आपल्या उत्तम अभिनयाने मोनिकाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
अभिनयाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत मोनिका नुकतीच पंजाबमधील अमृतसर येथे फिरायला गेली आहे.
-
या खास धार्मिक ट्रिपला मोनिका एकटी नसून, तिच्यासोबत तिची छोटी गोड मुलगी वृंदादेखील आहे.
-
या फोटोंमध्ये मोनिकाने जांभळ्या रंगाचा (पर्पल) सुंदर कुर्ता आणि त्यावर ऑलिव्ह ग्रीन रंगाची ओढणी असा पारंपरिक पोषाख परिधान केला आहे.
-
तिने डोक्यावर ओढणी घेतलेली दिसत असून, तिचा हा साधा आणि सोज्वळ लूक चाहत्यांना खूप आवडत आहे.
-
तिची चिमुरडी मुलगी वृंदा या फोटोंमध्ये कमालीची गोड दिसत असून, दोघींनीही मंदिरात दर्शन घेतले आहे.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना मोनिकाने या प्रवासाला ‘मनःशांती’, अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी