-
झी मराठी वाहिनीवर आजपासून (१५ जून) ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki TV Serial) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
आई-मुलीच्या नात्याची, त्यांच्या संघर्षाची आणि स्वप्नांचा वेध घेणारी ही एक हृदयस्पर्शी कहाणी असणार आहे.
-
ही मालिका केवळ एक कौटुंबिक नाट्य नसून स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नात्यांमधील भावनिक गुंतागुंत आणि सामाजिक बदल यांची प्रभावी मांडणी करणारी एक प्रेरणादायी कथा आहे.
-
“मुलगी हे ओझं नसून घराचा आधार असते” हा कृष्णाईचा ठाम विचार या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
-
स्वतःच्या पायावर उभे राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वाभिमान जपणे या मूल्यांचा वारसा कृष्णाई आपल्या मुलींना देते.
-
तिचा आणि तिच्या मुलींचा हा संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, अशी आशा आहे.
-
या मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकप्रिय मराठी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) एक खास लूक केला होता.
-
या निमित्ताने सायलीने तिच्या अत्यंत गाजलेल्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील ‘गौरी’ या भूमिकेची आठवण करून दिली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
“शेअर्स विका ३०-४० टक्के घसरण होणार आहे”, ‘या’ क्षेत्रातील कंपन्यांबाबत ब्रोकरेज फर्मचा इशारा