-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
आपल्या दर्जेदार विनोदशैली, अफलातून स्किट्स आणि कलाकारांच्या भन्नाट अभिनयामुळे या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील घराघरात हास्याचे कारंजे उडवले आहेत.
-
याच कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री चेतना भट (Chetana Bhat) सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
चेतनाने तिच्या या गोवा सफरनाम्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये चेतनाने गुलाबी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली असून तिचा हा कॅज्युअल लूक चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
-
या फोटोंना चेतनाने ‘आवारा मुसाफ़िर’ असे कॅप्शन दिले आहे.
-
चेतनाच्या या फोटोंवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब आणि निखिल बने यांच्यासह तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी