-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनीचा मुलगा व्योम याचा मुंज सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला.
-
या मंगलमयी सोहळ्याला मराठी चित्रपट व मालिका विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती.
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिने या सुंदर सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुखदा खांडकेकर, अभिजीत खांडकेकर, पूजा सावंत व भूषण प्रधान हे कलाकार एकत्र दिसत आहेत.
-
सुखदाने हे सुंदर फोटो पोस्ट करताना सोशल मीडियावर एक अतिशय खास कॅप्शनदेखील दिली आहे.
-
सुखदाने कॅप्शनमध्ये ‘व्योमची मुंज एक सुंदर सोहळा.. मित्रांबरोबर गप्पा, मजा आणि खूप प्रेम! अजून काय हवं?’ असे लिहिले आहे.
-
या खास कौटुंबिक सोहळ्यात सर्वच कलाकार अत्यंत सुंदर अशा पारंपरिक वेषभूषेमध्ये पाहायला मिळाले.
-
सोशल मीडियावर हे फोटो समोर येताच चाहत्यांनी व्योमसह महाजनी परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुखदा खांडकेकर आणि गश्मीर महाजनी/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी