-
आपल्या कसदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते.
-
नुकताच म्हणजे ५ जून २०२६ रोजी प्रदर्शित झालेला सईचा ‘तुंबाडची मंजुळा’ (Tumbadchi Manjula) हा हॉरर-कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
-
‘झी स्टुडिओज’ निर्मित आणि विविधा कोरगावकर दिग्दर्शित या चित्रपटात सईने ‘शोभा’ नावाची एक साधी पण तितकीच रहस्यमय भूमिका साकारली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र या चित्रपटातील सईच्या उत्कृष्ट अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे.
-
अभिनयाबरोबरच आपल्या अतरंगी फॅशन सेन्सने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या सईच्या एका हटके फोटोशूटने सध्या सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
-
सईने परिधान केलेला पांढऱ्या रंगाचा हा वेस्टर्न ड्रेस तिच्या ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाला अधिकच उठावदार बनवत आहे.
-
विशेष म्हणजे, या पांढऱ्या शुभ्र ड्रेसवर सईने परिधान केलेले ऑक्सिडाइज्ड दागिने तिच्या या लूकला एक वेगळाच क्लासी टच देत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
IND vs NZ: मॅट हेन्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे क्रिकेटच्या ५५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज